Press "Enter" to skip to content

सचिदानंद परमानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने आनंदी जीवनासाठी अध्यात्म! या विषयावर प्रवचन संपन्न !

प्रतिनिधी उरण (शंकर पाटील)

वशेणी येथील श्री. गणेश कृष्णा ठाकूर यांच्या मातोश्री श्रीमती महादीबाई कृष्णा ठाकूर यांच्या बाराव्या च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने श्री योगेश ठाकूर यांनी हे प्रवचन घेतले.

सदर प्रवचनामध्ये अध्यात्माचे महत्त्व काय? प्राणीमात्रांचे ध्येय कोणते आहे?चिरंतर आणि सर्वोच्च आनंदाची प्राप्ती कशी करावी? आपल्या जीवनातील ८० % समस्यांचे कारण हे अध्यात्मिक असून कलियुगामध्ये नामस्मरण ही साधना का महत्त्वाची आहे.अध्यात्म ही कृतीच शास्त्र आहे तसेच पितृदोष आणि श्री दत्तगुरूंच्या नामाचे महत्त्व या विषयी माहिती सांगितली तसेच आपत्काळ आणि साधनेचे महत्त्व,सुखदुःख म्हणजे काय? दुःख निवारण्याचा खरा मार्ग कोणता?कर्मफल सिद्धांत काय आहे?साधनेचे महत्त्व विषद करताना कुलदेवीच्या नामाजपाचे महत्त्व आणि नामजपाचे लाभ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असताना त्यांनी विविध समर्पक उदाहरणे देऊन आपल्या जीवनात अध्यात्माचे महत्व सांगितले.

आपले जीवन आनंदी करण्यासाठी नाम साधनेचे महत्व सांगताना नाम साधना ही बंधन विरहित साधना असून हाताने काम व मुखाने नाम अश्या पद्धतीनेही आपण आपल्याला जी वेळ मिळते त्या वेळेत आपण नाम साधना करून आपल्या जीवनात आनंद अनुभवू शकतो मात्र त्यासाठी आपण नाम साधनेला उद्यापासून नव्हे तर आज पासूनच सुरुवात केली पाहिजे असे ते म्हणाले.प्रवचनाचा लाभ त्यांच्या कुटुंबातील २० ते २५ सदस्यांनी घेतला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.