Press "Enter" to skip to content

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडणाऱ्या शायना एनसी चा जाहीर निषेध

पेण, ता. १९ (वार्ताहर) : शिवसेना शिंदे गटातील परप्रांतीय महिला पदाधिकारी शायना एनसी हिने एका कार्यक्रमात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडून टाकल्याचे कृत्य केले आहे त्यांच्या निषेधार्थ आज पेण तालुका शिवसेना कार्यकर्त्यांनी नगरपालिका चौकात एकत्र येत शायना एनसी हिचा जाहीर निषेध करून तिच्या फोटोवर जोडो मारो आंदोलन केले.

शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव चोरुन शिंदे गट पक्ष चालवत असताना त्याच पक्षातील महिला शायना एनसी हिने एका कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडून टाकला असल्याने त्या महिलेला पक्षातून तात्काळ काढून टाकावे आणि जोपर्यंत शायना एनसी शिवतीर्थावर तसेच मातोश्रीवर जाऊन माफी मागत नाही तोपर्यंत तीला शिवसेना ठाकरे गट माफ करणार नसल्याचे पेण तालुकाध्यक्ष समीर म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.तर आमच्या दैवतावर अशा पद्धतीने कृत्य करून स्वतःला प्रसिद्धीचा हाव आणत असेल तर त्या शायना एनसी चा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे ठाकरे गटाच्या दिपश्री पोटफोडे या म्हणाल्या.

यावेळी अविनाश पाटील, समीर म्हात्रे, योगेश पाटील, चेतन मोकल, पेण शहर प्रमुख सुहास पाटील, असदअली अखवारे, समीर साठी, लवेंद्र मोकल, अनंत दिवेकर, नितीन पाटेकर, बाळू पाटील, नरेश सोनावणे, गजानन मोकल, हिराजी चौगुले आदिंसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.