
पनवेल, दि.१७ (वार्ताहर) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल शहर शाखेतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विभागप्रमुख प्रवीण जाधव, शहर संघटिका उज्ज्वला गावडे, माजी नगरसेवक अच्युत मनोरे, राकेश टेमघरे, प्रभागप्रमुख नरसाळे, शाखाप्रमुख मयुरेश पाटील, आदिल अवसेकर, राजेश शेट्टीगार, विभाग संघटिका अश्विनी देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक अरुण टाकूर, सचिन कदम, मयूर दसवते, अतुल टेमघरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या नेतृत्वाची आणि शिवसेनेच्या वाटचालीतील योगदानाची आठवण यावेळी काढण्यात आली.



Be First to Comment