






प्रतिनिधी ( प्रो प्रशांत म्हात्रे) सारडे विकास मंच तर्फे दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गडकिल्ल्यांचे महत्त्व मुलांना समजावे, यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन केले जाते.
यावर्षी देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 68 किल्ल्यांची नाव नोंदणी झाली.सह्याद्री प्रतिष्ठानचे श्री. प्रितेश कोळी, श्री. अभिषेक ठाकूर आणि श्री. अक्षय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व किल्ल्यांचे परीक्षण आणि निरीक्षण करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
- प्रथम क्रमांक किल्ले रायगड – राज महेश घरत.
- द्वितीय क्रमांक मुरुड जंजिरा – स्वाद घनश्याम पाटील. 3.उत्तेजनार्थ – अजिंक्यतारा – ईशान निलेश म्हात्रे.
- उत्तेजनार्थ सिंधुदुर्ग किल्ला
- मोहित मिलन माळी
विजेत्यांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.तसेच
68 किल्ले स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धकांना सौ विनंती मोहन पाटील सरपंच नानोशी पनवेल याच्या तर्फे भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसाद पाटील, माजी सरपंच वशेणी, सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड सर, रविंद्र पाटील माजी उपसरपंच कळंबुसरे, ॲड. रनिता ठाकूर, आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर, कॉमेडी कलाकार रोशन घरत, गजानन ठाकूर, कृषी मित्र प्रकाश माळी, हॉटेल MDS चे मालक नितीन म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, विनोद पाटील श्री गणेश फर्निचर चे मालक, गणेश पाटील , अमोल पाटील, गणेश पाटील, सिद्धेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ॲड. रनिता ठाकूर मॅडम यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक चेतन पाटील खोपटे यांच्या वाणीतून करण्यात आले
याप्रसंगी निवास गावंड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “सारडे विकास मंच ही एक आदर्श संस्था आहे, अशा संस्थेमध्ये आम्ही आहोत याचा आम्हास अभिमान आहे,” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
किल्ले स्पर्धेसाठी बक्षिसे : श्री. रविंद्र पाटील, माजी उपसरपंच कळंबुसरे, प्रा. अनिल नायडू, श्री. प्रशांत म्हात्रे सर, श्री. विनायक म्हात्रे
खाऊची व्यवस्था : श्री. हरिश्चंद्र म्हात्रे, श्री. गणेश पाटील, श्री. नितीन म्हात्रे
किल्ले नाव नोंदणी व फोटोग्राफी ही रिया म्हात्रे, नील म्हात्रे, अक्षता, निरव म्हात्रे, राजेश पाशी, सारा म्हात्रे, विभा म्हात्रे या बच्चे कंपनीने केली. तर प्रकाश माळी, विनोद पाटील, अमोल पाटील, सिद्धेश पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे यांनी मोलाचे योगदान देऊन ही गडकिल्ले स्पर्धा यशस्वी करण्यास मदत केली.
शेवटी सारडे विकास मंचचे अध्यक्ष श्री. नागेंद्र म्हात्रे यांनी उपस्थितांचे तसेच विशेष मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.




Be First to Comment