
पनवेल : प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या आनंदात समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेत, नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ यांच्या वतीने शहरातील कुष्ठरुग्ण वसाहतीमधील बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसोबत सणाचा आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात राबवण्यात आला.
या विशेष उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि आपुलकीचा संदेश देण्यात आला आहे. फराळ वाटप करताना उपस्थित मान्यवरांनी सर्व कुष्ठरोगी बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनादिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
हा उपक्रम दरवर्षी नियमितपणे राबवला जात असल्याने वसाहतीमधील नागरिकांनी आयोजकांचे विशेष आभार मानले. यावेळी नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ यांच्यासह श्री. अशोक आंबेकर, श्री. संजय जाधव, श्री. पप्पू साळवे, श्री. विजय इंगोले, श्री. जरीना शेख, सौ. शैला आंबेकर, नितीन भुजबळ, किशोर शिंदे, चंद्रकांत पट्टेबहादूर, अजित लोंढे आदी मान्यवर तसेच वसाहतीमधील सर्व कुष्ठरोग वस्तीचे कुटुंबे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Be First to Comment