
पनवेल मधील आदिवासी भागातील गरजू , वंचित घटकातील विद्यार्थ्यां आणि कारागृह बंदी असलेल्या महिलांच्या मुलांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी आधार ए सोशल रिसर्च अंड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने टेंबोडे येथील वाघऱ्याचीवाडी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यात महिला व मुलांना दिवाळी फराळ, वह्या, स्कूल बॅग, टी शर्ट, पेन्सिल बॉक्स आदी साहित्य देण्यात आले अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील शिरीषकर यांनी दिली.
या उपक्रमामुळे लाभार्थांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता, यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व पालकांनी आधार फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी संस्थेच्या वतीने डॉ. सुनील शिरीषकर अध्यक्ष, अजय कदम उपाध्यक्ष अभिनव येलवे सह सचिव, रोहित देखणे खजिनदार, राहुल तेलंग सदस्य, पंकज मोहिते सदस्य आणि मोठ्या संख्येने आदिवासी मुले, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.




Be First to Comment