

नवीन पनवेल : वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव आणि जल्लोष नव्हे, तर आपल्या आनंदात समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांनाही सहभागी करून घेण्याची संधी असते. याच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत क्रांती सम्राट च्या संपादिका दिपाली पारसकर यांच्या वाढदिवसानिमित्त ऋषीवन वृद्धाश्रम, नवीन पनवेल येथे अन्नदानाचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
शुक्रवार, दिनांक. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता हा उपक्रम पार पडला. ऋषीवन केअर सेंटर, सेक्टर ११, नवीन पनवेल येथील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, आपुलकी आणि सहवासाची गरज असते. अशा वेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवणे हीच खरी समाजसेवा आहे. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणाला फाटा देत अन्नदानासारखा सामाजिक उपक्रम राबवण्याचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे.
‘समाजसेवा हीच खरी वाढदिवसाची भेट’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात येत असून, समाजातील इतरांनीही आपले वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर आनंदाचे क्षण सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करावेत, असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून मिळत आहे.
क्रांती सम्राटच्या संपादिका दिपाली पारसकर यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हीच या वाढदिवसाची खरी भेट ठरणार आहे.




Be First to Comment