Press "Enter" to skip to content

इंग्रजी वाचकांसाठी सिटीबेलची “जर्नी ऑफ इंडिया” ची भेट– महेंद्र घरत


आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते सिटीबेलच्या सातव्या इंग्रजी दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

     सिटी बेल या इंग्रजी नियतकालिकाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या "जर्नी ऑफ इंडिया* या थीम बेस्ड दिवाळी अंकाचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते प्रकाशन संपन्न झाले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दीपावलीतील पाडव्याच्या सुमुहूर्तावर समूह संपादक विवेक पाटील आणि समूह संपादक मंदार दोंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.
        यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महेंद्र शेठ घरत म्हणाले की पत्रकार विवेक पाटील आणि पत्रकार मंदार दोंदे यांनी अत्यंत संघर्षमय परिस्थितीमध्ये सिटीबेलची मुहूर्तमेढ रोवली. जेव्हा कोरोना मुळे संपूर्ण जग थांबले होते त्यावेळेस इंग्रजी भाषेमध्ये वृत्तपत्र सुरू करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय या दोघांनी घेतला. जे अनेकांसाठी संकट होते त्याचे या पत्रकार जोडगोळीने संधीत रुपांतर करून दाखवले, मला त्यांचा अभिमान वाटतो कारण त्यांनी या संधीचे सोने केले आहे. आज इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. सिटीबेलच्या यंदाच्या विशेष अंकामध्ये भारताच्या अनादी अनंत कालापासूनची वाटचाल वाचकांना वाचायला मिळणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील संग्राम देखील अत्यंत सुंदर रित्या मांडला आहे. सगळ्यांनी आवर्जून वाचावा असा सिटीबेलचा जर्नी ऑफ इंडिया हा विशेषांक झाला आहे. मंदार आणि विवेक हे नेहमीच अपडेट राहण्यासाठी नाविन्याचा शोध घेत असतात. त्यांच्या सातत्याने नवनवीन काहीतरी निर्माण करण्याच्या वृत्तीचे मला कौतुक आहे.
        प्रास्ताविक सादर करताना समूह संपर्क मंदार दोंदे म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुशल संघटक आणि कामगार नेते म्हणून नावलौकिक कमाविलेल्या महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते सिटीबेल विशेष अंकाचे प्रकाशन झाल्यामुळे सिटीबेलचा गौरव शतपटीने वाढला आहे.सिटी बेल ने यापूर्वी सलग सहा वर्षे  समय सूचक अशा थीम घेऊन दिवाळी अंक प्रसिद्ध केलेले आहेत.

कोरोना विषाणूच्या कालखंडामध्ये “शो मस्ट गो ऑन!” आणि त्यानंतर पोस्ट “पँडेमिक इन्व्हेस्टमेंट” या आर्थिक विषयावरती दिवाळी विशेष अंक प्रसिद्ध केले. त्यानंतर सलग तीन वर्ष क्रीडा विशेषांक, शैक्षणिक विशेषांक, इंटिरियर डिझाईनिंग दिवाळी विशेषांक प्रसिद्ध केल्यानंतर यंदाचे वर्षी आपल्या देशाचा अनादी-अनंत कालापासूनचा प्रवास अधोरेखित करणारा “जर्नी ऑफ इंडिया” हा दिवाळी विशेष अंक प्रसिद्ध केला आहे.
यावेळी न्यू मेरी टाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सचिव रमण सर,वैभव पाटील,पत्रकार कृष्णा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.