Press "Enter" to skip to content

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार विक्रांत पाटील यांचा पाच लाखांचा मदतनिधी !

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी पाच लाख रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. सामाजिक बांधिलकी जपत आमदार श्रीं.विक्रांत पाटील आणि कोकण म्हाडा मा. सभापती श्रीं बाळासाहेब पाटील यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हा पुढाकार घेतला व आई तुळजाभवानीने मुख्यमंत्री देवा भाऊंचे हात बळकट करावेत आणि संकटग्रस्त जनतेला मदत करण्यासाठी त्यांना अधिक सामर्थ्य द्यावे, अशी प्रार्थनाही केली.

दिवाळीच्या शुभपर्वावर प्रत्येकांच्या आयुष्यात सुख, समूद्धी आणि आनंद नांदो. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक संकटमुक्त होवोत. राज्यांने विकासाची नवी शिखरे गाठत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

राज्यातील विविध भागांत पावसाचे अनियमित प्रमाण आणि शेती उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे शेतकरी वर्गासमोर आर्थिक आव्हाने निर्माण झाली आहेत. विशेषत, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पाणीपुरवठा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यांची गरज आहे.

राज्य सरकारकडूनही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना आणि मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रयत्नांना सामाजिक संस्थांसह लोकप्रतिनिधींच्या मदतीची जोड मिळणे महत्त्वाचे आहे. याच भावनेतून आमदार विक्रांत पाटील यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नेते कोकण म्हाडा मा. सभापती श्रीं बाळासाहेब पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील, श्रीं स्वप्नील ढमाले, श्रीं आकाश पाटील आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.