अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी ऑक्टोबर २०२६ मध्ये भारतातील आपल्या अधिकृत दौऱ्यादरम्यान गुजरात मधील जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) जगातील सर्वात मोठ्या ऑईल रिफायनरीला भेट दिली.मध्य पूर्व (West Asia) भागातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी अमेरिकेला भारताच्या प्रचंड रिफायनिंग क्षमतेची मदत हवी आहे. मुळात मार्को यांच्या भारत भेटीने भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यावसायिक करार वृद्धिंगत झाल्यामुळे भेटीने विरोधी पक्षाच्या फुग्यातली हवा पार काढून टाकली आहे.
अमेरिका व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलासाठी नवीन बाजारपेठ शोधत आहे. जामनगर रिफायनरीमध्ये 'जड कच्चे तेल' (Heavy Crude Oil) रिफाईन करण्याची उत्तम क्षमता आहे. त्यामुळे अमेरिकेने रिलायन्सला व्हेनेझुएलाच्या तेलाचे रिफायनिंग वाढवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून रशियावरील ऊर्जेचे अवलंबित्व कमी करता येईल.अमेरिकेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. रिलायन्स ही डिझेलची मोठी निर्यातदार कंपनी असल्याने जागतिक बाजारात इंधनाचा पुरवठा वाढवून अमेरिकेतील किमतींवर असणारा दबाव कमी करणे हा या भेटीचा एक उद्देश होता.त्यामुळे रेजिम चेंजच्या दिवास्वप्नांमध्ये गुरफटलेल्या विरोधकांच्या खाडकन मुस्काटीत मारणारा हा दौरा होता.
रिलायन्स इंडस्ट्रीज अमेरिकेच्या टेक्सास (Texas) येथे एका मोठ्या रिफायनरी प्रकल्पात भागीदारी करत आहे. गेल्या ५० वर्षांतील अमेरिकेतील हा पहिलाच मोठा रिफायनरी प्रकल्प ठरणार आहे. या व्यावसायिक गुंतवणुकीला आणि भारत-अमेरिका आर्थिक सहकार्याला गती देणे हे देखील या भेटीचे कारण होते.ऑईल रिफायनरीसोबतच रुबिओ यांनी रिलायन्सच्या 'गीगाफॅक्टरीज', नवीन ग्रीन एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग हब आणि डिजिटल पायाभूत सुविधांचाही आढावा घेतला. थोडक्यात सांगायचे तर, जागतिक ऊर्जा संकट टाळणे, इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे आणि भारत-अमेरिका यांच्यातील व्यावसायिक गुंतवणूक वाढवणे या उद्देशाने मार्को रुबिओ यांनी ही भेट दिली.
मंगळवारी मुंबईत दाखल झालेल्या रुबिओ यांनी बुधवारी सकाळी प्रथम गौतम अदानी यांची भेट घेतली, त्यानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याशी चर्चा केली. अदानी समूह पोर्ट, विमानतळ, ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करत आहे, तर टाटा समूह आयटी, स्टील, ऑटोमोबाईल्सपासून ते सेमीकंडक्टर आणि बॅटरी तंत्रज्ञानापर्यंत विस्तारलेला आहे. या दोन्ही औद्योगिक दिग्गजांसोबत झालेल्या बैठकीत भारत-अमेरिका व्यावसायिक संबंधांना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.
पक्ष विरोधी नेत्याचा होरा चुकत असल्याचे आणखीन एक उदाहरण पाहुयात. एलोन मस्क याने अंबानी भारताचे पंतप्रधान आहेत का? अशा स्वरूपाची उपहासात्मक आणि नैराश्याने भरलेली पोस्ट टाकली होती. तेव्हा राहुल याच्या मदतीला धावून गेला. जगातले सगळ्यात महागडे आणि अवसान घातकी इंटरनेट मायाजाल पक्षविरोधी नेत्याला का आवडते हे तोच जाणे. अमेरिका आणि रशिया यांच्यात नैसर्गिक वायू आणि नैसर्गिक तेल या संदर्भात करार झाल्यानंतर आता युक्रेन उघडा पडला आहे. मागच्याच आठवड्यात रशियाने त्याच्यावरती तीव्र हल्ले चढवले. यावेळी राहुलचा आवडता इलॉन मस्क याच्या स्पेसएक्स (SpaceX) कंपनीने युक्रेनमधील स्टारलिंक इंटरनेट सेवेवर वेगाची मर्यादा (स्पीड कॅप) घातली होती.
युक्रेनच्या स्टारलिंक सेवेवर १६० किमी प्रति तास (160 km/h) पेक्षा जास्त वेगावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे युद्धभूमीवर वेगाने चालणारे ड्रोन आणि इतर लष्करी यंत्रणांची कनेक्टिव्हिटी अचानक तुटत होती. निर्बंधांमुळे रशियाकडून येणाऱ्या घातक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वेळेवर माग काढणे युक्रेनच्या सैन्याला कठीण झाले होते. यामुळे अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आले आणि युक्रेनला काही लष्करी मोहिमा रद्द कराव्या लागल्या.
फुल टाईम ट्रॅव्हलर आणि पार्ट टाइम पक्षविरोधी नेते असणाऱ्या राहुल गांधी यांस विसर पडला असावा परंतु कारगिल युद्धाच्या वेळेस जिहादी आतंकवाद्यांच्या वेशामध्ये पाकिस्तानचे सैन्य तोलोलींग, द्रास, कारगिल या सेक्टर वरती घुसखोरी करत असताना त्यांचे मॅपिंग करण्यासाठी स्टार लिंक कडे भारत सरकारने ॲक्सेस मागितला होता. स्टार लिंक कंपनीने आपला प्रस्ताव फेटाळला होता. ज्या सेवा पुरवठादाराने युद्धामध्ये आपली साथ दिली नव्हती त्याच्या स्वागतासाठी पक्ष विरोधी नेता का म्हणून पायघड्या घालत असेल? असो! एकीकडे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ देशातील उद्योजकांशी व्यावसायिक करार करत असताना राहुल बाबा मात्र परदेशात पुढच्या आंदोलनाची तयारी करत आहेत. तिकडून आल्यानंतर त्यांनी केलेले दावे किती वेळात फोल ठरतात एवढेच पाहणे आपल्या हातात आहे.


Be First to Comment