Press "Enter" to skip to content

राष्ट्रीय एकात्मता मोटर सायकल रॅलीचे पेण मध्ये जंगी स्वागत ; सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात व्यसनमुक्ती संदेश

पेण, ता. 24 (वार्ताहर) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविण्यासाठी व्यसनमुक्त भारत मोहिमेअंतर्गत पोलीस दलाच्या मार्फत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मोटर सायकलद्वारे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली पेण येथील हॉटेल साई सहारा येथे आली असता हॉटेलचे मालक कल्पेश ठाकूर यांच्या हस्ते जंगी स्वागत करण्यात आले.

३१ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर जगभरात व्यसनमुक्तीचा संदेश देत दक्षिण भारतातून सुरू झालेली ही रॅली गोवा आणि कोकणमार्गे गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. या रॅलीमध्ये केरळ, कर्नाटक, गोवा आणि लक्षद्वीप पोलीस दलातील ५७ मोटारसायकलस्वार सहभागी झाले असून ही रॅली स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया (गुजरात) येथे तीचा शेवट होणार आहे.आज पेण येथे दाखल झाल्यानंतर पेण पोलीस ठाणे, दादर सागरी पोलीस ठाणे तसेच हॉटेल साई सहारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश ठाकूर यांच्या वतीने रॅलीतील सहभागी पोलिसांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी पेण पोलीस उप अधीक्षक जालिंदर नालकुल, पेण पोलीस निरीक्षक संदीप भोसले, दादर सागरी पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रायगड वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन पवार, पेण सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे, गोपनीय शाखेचे किशोर घरत तसेच रायगड पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देणे, नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे असे या रॅलीचा प्रमुख उद्देश असून प्रत्येक टप्प्यात टप्प्यात महाराष्ट्र पोलीस अधिकारी व कर्मचारी या अभियानात सहभागी होत असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.