
रत्नागिरी, दि. २२ ऑक्टोबर २०२६ : रत्नागिरी येथे दिनांक २५ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या Inter-Collegiate Taekwondo Championship 2026–27 या आंतरमहाविद्यालयीन तायक्वाँडो स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय तायक्वाँडो पंच श्री. सुभाष पाटील यांची रेफ्री चेअरमन (Referee Chairman) म्हणून निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनुभवी राष्ट्रीय दर्जाच्या पंचांची निवड करण्यात आली असून, विद्यापीठाचे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन श्री. मनोज रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय तायक्वाँडो पंच म्हणून सुभाष पाटील यांनी भारतासह अनेक देशांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचा प्रदीर्घ अनुभव असून, तायक्वाँडो खेळाच्या प्रसारासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत.

रत्नागिरी येथे होणारी ही विद्यापीठस्तरीय स्पर्धा शिस्तबद्ध, पारदर्शक आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सुभाष पाटील हे निःस्वार्थ भावनेने आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ या स्पर्धेतील पंचांना तसेच खेळाडूंना होणार आहे.
स्पर्धेसाठी निवड झालेल्या पंचांची यादी
१. सुभाष पाटील — रेफ्री चेअरमन (Referee Chairman)
२. कार्तिक नायडू (Karthik Naidu)
३. सुमेध मार्चंडे (Sumedh Marchande)
४. अमेय मोरे (Amey More)
५. स्वप्नील साळुंखे (Swapnil Salunkhe)
६. अंकिता पोते (Ankita Pote)
७. तुषार पाटील (Tushar Patil)
८. शीतल आचरेकर (Sheetal Achrekar)
९. स्वप्नील दांडेकर (Swapnil Dandekar)
१०. कुणाल चव्हाण (Krunal Chavan)
११. श्रुती मांडवकर (Sruti Mandavkar)
१२. भारत कार्रा (Bharat Karra)
१३. प्रतीक पवार (Pratik Pawar)
१४. आकाश बरई (Akash Barai)
१५. तेजस माळी (Tejas Mali)
१६. साहिल वाघमारे (Sahil Waghmare)
१७. संकेत सावंत (Sanketa Sawant)
या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून सुभाष पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत असून, रत्नागिरी येथे होणारी आंतरमहाविद्यालयीन तायक्वाँडो स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व पंचांकडून उत्कृष्ट योगदान दिले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Be First to Comment