पनवेल / बातमीदार

सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने पनवेल महानगरपालिकेच्या निर्मितीला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने आयुक्त मंगेश चितळे यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार जेष्ठ पत्रकार माधव पाटील, सल्लागार डॉक्टर संजय सोनावणे, सल्लागार संजय कदम, सल्लागार मंदार दोंदे, खजिनदार दत्ता कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या द्वितीय वर्धापन दिन निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठी माझी देवालाही आवडे या संत गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सन्माननीय उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमात महापौर नितीन भाई पाटील यांच्या समवेत प्रशासनाच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या सत्काराचे नियोजन केलेले होते.
काही अपरिहार्य कारणामुळे आयुक्त मंगेश चितळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. आज बुधवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने पनवेल मनपाच्या दशकपूर्ती निमित्ताने आयुक्त मंगेश चितळे यांना सन्मानित केले.

Be First to Comment