Press "Enter" to skip to content

तळोज्यात ‘फक्र-ए-निस्वां अवॉर्ड २०२६’ सोहळा उत्साहात संपन्नगुणवंत महिलांचा गौरव; रायगड जिल्ह्यात उलमा बोर्डाच्या नवीन नियुक्त्या


पनवेल, दि.२० (वार्ताहर) : महिलांचा सन्मान, शिक्षण आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया उलमा बोर्ड (रजि.)च्या महिला विभागातर्फे तळोजा फेज १ आणि फेज २ येथे ‘ऑल महाराष्ट्र वुमेन्स कॉन्फरन्स व फक्र-ए-निस्वां अवॉर्ड २०२६’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

डॉक्टर, शिक्षिका, मुख्याध्यापिका, उद्योजिका, व्यावसायिक महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. महिलांचे शिक्षण, आत्मविश्वास, स्वावलंबन, समान संधी आणि समाजाच्या विकासातील त्यांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्या सामाजिक परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असा संदेश या परिषदेतून देण्यात आला.

या कार्यक्रमाला ऑल इंडिया उलमा बोर्डाचे राष्ट्रीय सरचिटणीस अन्जार अन्वर खान, मुंबईचे अध्यक्ष, मुंब्रा येथील नगरसेविका सहर युनूस शेख, तळोजा येथील नगरसेविका शुशी नागी, तसेच रजनी मॅडम आणि पाटील मॅडम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांसोबतच संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. अ‍ॅड. शफी सय्यद यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी, कुलसुम मस्तान शेख यांची रायगड जिल्हा महिला विभागाच्या अध्यक्षपदी आणि शाहनवाज शेख यांची रायगड जिल्हा विद्यार्थी विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय सुमिया सय्यद यांची नवी मुंबई विद्यार्थी विभागाच्या अध्यक्षपदी, शमा खान यांची तळोजा वॉर्ड महिला विभागाच्या अध्यक्षपदी, हसीना खान यांची उपाध्यक्षपदी, तर जमात पोटे यांची तालुका स्तरावरील उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
महिला, तरुण आणि विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडणे, शैक्षणिक व सामाजिक जागृती वाढवणे आणि गरजू व्यक्तींना मदत करणे हा या नियुक्त्यांचा प्रमुख उद्देश आहे.

हाजी शाहनवाज खान (प्रभारी, महाराष्ट्र कोअर समिती व कोकण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाचे आयोजन केले. महिला सक्षमीकरण, शिक्षण प्रसार, स्वावलंबन आणि समाजसेवेच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.