विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देत भाविकांशी साधला संवाद


पनवेल (प्रतिनिधी) नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त पनवेल परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवांना भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेटी देऊन दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचे मनोभावे पूजन करून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
या भेटीप्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत भक्तिभावाने दुर्गामातेचे दर्शन घेतले आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. नवरात्रोत्सवानिमित्त पनवेल परिसरातील विविध मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवांच्या माध्यमातून भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा जागर होत असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देत दुर्गामातेचे दर्शन घेतले. तसेच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधला. नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा उत्सव मानला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश दिला जातो. पनवेल परिसरातील विविध मंडळांकडून दरवर्षी उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा केला जात असून, या उत्सवांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.


Be First to Comment