Press "Enter" to skip to content

७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भीम अनुयायांचे अभिवादन

पनवेल (प्रतिनिधी)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, पनवेल, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, बौद्ध धम्म प्रचार-प्रसार समिती आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, संस्था संघटनांचे पदाधिकारी, यांच्यासह अनेक भीम अनुयायांनी उपस्थित राहून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

यावेळी उपस्थितांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.