Press "Enter" to skip to content

जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आवरेचे तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश 9 विद्यार्थ्यांची निवड ही जिल्ह्यास्तरावर झाली आहे

प्रतिनिधी आवरे (विजय पाटील)

क्रीडा युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी आयोजित रा. जि .प शाळा मोठी जुई येथे19 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या तालुका तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरे विद्यालयाने ज्यूडो कराटे या स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत विजयश्रीची माळ आपल्या गळ्यात घातली.

सदर ९ विद्यार्थ्यांची निवड ही जिह्यास्तरावर झाली आहे हे विशेष होय अशा पद्धतीने संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व जे आहे ते जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरे च्या विद्यार्थ्यांनी राखले जिद्द, मेहनत चिकाटी व आपल्या ध्येयावर एकाग्रता ठेवल्याने सर्व काही होत असते याच मूर्तीमध्ये उदाहरण म्हणजेच जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे विद्यालयातील विद्यार्थ्यानी चमकदार केलेली कामगिरी होय

९ विद्यार्थी हे सुवर्णपदकाचे मानकरी झाले यात प्रामुख्याने तनिष्का गावंड, भूमी म्हात्रे, वीरा गावंड, श्रीची,वर्तक, अक्षरा वर्तक, सई म्हात्रे, तन्वी गावंड, मौर्य,गावंड, शौर्य,गावंड, व कांस्य पदकाचे 3 विद्यार्थी मानकरी सांन्वी गावंड ,देवांग ठाकूर निर्मित ठाकूर हे होय आणि हीच खरी विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी होय म्हणजेच या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या क्रीडात्मक दर्जा हा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा व कराटे शिक्षक शुभम ठाकूर सर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रतिक ठाकूर सर, विश्वस्त श्री वामन ठाकूर सर, विश्वस्त सौ अलका ठाकूर , मॅडम सिंधु ठाकूर मॅडम विश्वस्त प्रसाद ठाकूर सर आदिनाथ ठाकूर सौ रीना ठाकूर मॅडम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कौतुक केलेले आहे विद्यार्थ्यांनी मिळालेले यश हे आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक जनार्दन ठाकूर सर यांना अर्पण केलेले आहे अशा पद्धतीने जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरेची तालुकास्तरीय कराटे स्पर्धेवर वर्चस्व राखले

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.