
पनवेल, दि.१७ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलीस दलातील नवनाथ कोळेकर यांची कन्या कु. पूर्वा प्रिया कोळेकर हिने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पूर्वा ही सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील नांदल गावची कन्या आहे. तिच्या या यशामुळे कोळेकर कुटुंबासह नांदल गाव आणि नवी मुंबई पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.
राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवणाऱ्या पूर्वाकडून आता राष्ट्रीय स्तरावरही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.



Be First to Comment