
ब्रिटनचे खासदार जेरेमी कॉर्बिन आणि मेक्सिकोचे मंत्री Héctor Ulises García Nieto यांची घेतली भेट
मेक्सिको सिटी, दि. १७ ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा ITF आशिया विभागाचे उपाध्यक्ष महेंद्रशेठ तुकाराम घरत यांनी मेक्सिको सिटी येथे १४ ते १६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित ITF Executive Board Meeting मध्ये सहभाग घेतला. या आंतरराष्ट्रीय बैठकीच्या निमित्ताने त्यांनी ब्रिटनचे खासदार जेरेमी कॉर्बिन (Jeremy Corbyn) तसेच मेक्सिको सिटी सरकारच्या मोबिलिटी विभागाचे मंत्री Héctor Ulises García Nieto यांची भेट घेतली.
या बैठकीच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील कामगारांचे प्रश्न, कामगारांचे हक्क, सुरक्षित कामाचे वातावरण, न्याय्य वेतन आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. कामगारांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि कामगारांच्या प्रश्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी व्यासपीठ मिळावे, यासाठी महेंद्रशेठ घरत यांनी आपली भूमिका मांडली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांशी संवाद साधत कामगारांच्या प्रश्नांवर सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने हा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.
कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


Be First to Comment