
पनवेल, दि.१५ (वार्ताहर) : महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि वेळेत निदानाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने पार्श्वा वुमेन्स फाउंडेशनच्या वतीने पनवेल येथे मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन, इनर व्हील क्लब ऑफ न्यू पनवेल आणि पीसीसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर यांचे सहकार्य लाभले.
हे शिबिर पीसीसी सेंटर केअर, पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहावे, नियमित तपासणी करून घ्यावी आणि स्तन कर्करोगाची संभाव्य लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. जयश्री पाटील, सचिव रोटेरियन अॅड. हितेश राजपूत, इनर व्हील क्लब ऑफ न्यू पनवेलच्या अध्यक्षा अंजली तवटे आणि सचिव पल्लवी पाटील यांच्यासह पार्श्वा वुमेन्स फाउंडेशनच्या सदस्यांनी सहभाग घेतला. डॉ. पुष्पक चिरमाडे यांच्यासह बसंती जैन, शीतल ठक्कर, धनश्री गुंडेचा, रीना परमार, नैना भंथिया, भूमिका परमार, नेहा गांधी, मनाली परमार आणि पूजा मारलेशा यांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले.
महिलांच्या आरोग्याला प्राधान्य
स्तन कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे महिलांनी आरोग्यविषयक लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अशा आरोग्य शिबिरांमुळे महिलांमध्ये जागरूकता वाढण्यास आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन मिळण्यास मदत होते. : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. जयश्री पाटील


Be First to Comment