Press "Enter" to skip to content

तळोजा नावडे गावाच्या रिंग रोडसाठी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे , नगरसेवक हरीश केणी, नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांचा पुढाकार; तळोजा फेज-२ ते खारघर मार्ग डिसेंबरपूर्वी खुला होणार !

पनवेल : नावडे गावाच्या रिंग रोडचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तसेच परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे ,नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक प्रकाश म्हात्रे, म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. यासोबतच तळोजा फेज-२ ते खारघर हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी सिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन नावडे गावाच्या रिंग रोडचा प्रश्न सोडविण्याची तसेच तळोजा फेज-२ ते खारघर मार्ग लवकरात लवकर खुला करण्याची मागणी करण्यात आली. चर्चेदरम्यान सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून हा मार्ग येत्या डिसेंबरपूर्वी नागरिकांसाठी खुला करण्याचे आश्वासन मिळाल्याचे सांगण्यात आले.

हा मार्ग खुला झाल्यास परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून, वाहतूक कोंडीच्या समस्येतूनही मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.

या वेळी विरोधी पक्षनेते, नगरसेवक अरविंद म्हात्रें त्याचबरोबर स्थायी समिती सदस्य नगरसेवक हरेश केणी, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक प्रकाश म्हात्रे आणि नगरसेवक तुषार पाटील उपस्थित होते.

नागरिकांच्या सोयीसाठी प्रलंबित वाहतूक व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.