Press "Enter" to skip to content

मुंबई- गोवा महामार्गाला लागूनच केबल टाकण्याचे काम सुरू ; ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समिर म्हात्रे यांची तक्रार

पेण, ता. १५ (वार्ताहर) : मुंबई- गोवा महामार्गाला लागूनच ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे मात्र हे काम बेकायदेशीर आणि राष्ट्रीय महामार्गाला घातक ठरणारे असल्याने या कामाची तात्काळ चौकशी करून सदरचे काम ताबडतोब थांबविण्यात यावे अशी तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे पेण तालुका प्रमुख समिर म्हात्रे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई- गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यामधील जवळपास ५८.७०० किलोमीटरवर
ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम हे नव्याने आणि नियमबाह्य तसेच धोकादायक असल्याने सदरच्या नियमबाह्य कामाची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करून टाकलेली अनाधिकृत केबल हटवून महामार्गाची मूळ स्थिती पूर्ववत करावी या महामार्गालगत केबल टाकण्यासाठी उत्खनन करत असल्याने रस्त्याची सुरक्षितता, पावसाच्या पाण्याचा निचरा, रस्त्याच्या कडांची दुरावस्था आणि वाहनचालकांची सुरक्षितता याबाबत गंभीर प्रश्न येथे निर्माण होत असून उत्खननामुळे रस्ता खचणे, चिखल निर्माण होणे किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होणे यांसारख्या समस्या वारंवार उद्भवू शकत आहेत. त्यामुळे संबंधित कार्यालयाने याची दखल घ्यावे असे या निवेदनात म्हटले आहे.

मुंबई- गोवा महामार्गाला लागूनच टाकण्यात येत असलेल्या ऑप्टिकल फायबर केबल या कामाबाबत रद्द करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

रवींद्र इंगोले – संचालक, एनएचआय प्रकल्प
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.