Press "Enter" to skip to content

‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत रील स्पर्धेचे आयोजन;  २५ हजारांचे रोख पारितोषिक

पनवेल (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला महाराष्ट्राच्या गतिमान विकासाची जोड देत, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत इन्फ्लुएन्सर ‘रील स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देतानाच नवी मुंबई व परिसरातील सुरू असलेल्या विविध विकासप्रकल्पांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या क्रिएटिव्हिटीला व्यासपीठ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू , पनवेल-कर्जत नवीन दुहेरी रेल्वे मार्ग, नेरूळ-बेलापूर-उरण नवीन रेल्वे मार्ग, नवी मुंबई मेट्रो विस्तार (विरार-अलिबाग मल्टी-मॉडेल कॉरिडॉर), बदलापूर-कळंबोली (पनवेल) जोडरस्ता व उन्नत मार्ग, जेएनपीटी बंदर विस्तार व एसईझेड तसेच करंजा बंदर प्रकल्प हे विषय देण्यात आले आहेत.

स्पर्धेतील रीलची कमाल कालमर्यादा ६० सेकंद असून रील फॉरमॅटमध्येच ती तयार करणे आवश्यक आहे. स्पर्धकांना मराठी, इंग्रजी किंवा हिंदी भाषेत रील सादर करता येईल. नावनोंदणीची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर २०२६ असून ही स्पर्धा उत्तर रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेतील विजेत्याला २५ हजारांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असून इतर विजेत्यांसाठीही आकर्षक पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. त्यामुळे तरुणाईने आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देत या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ८७६७१४९२०३ / ९०२९५८०३४३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.