Press "Enter" to skip to content

दिवाळीपूर्वी वीज कर्मचाऱ्यांना यांना २५,००० बोनस व सानुग्रह अनुदान देण्याची वर्कर्स फेडरेशन मागणी

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने मा.देवेंद्रजी फडणवी‌स मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकारी कृती समिती बरोबर वाटाघाटी दरम्यान सन २०२४ व २०२५ सालाचा सानुग्रह अनुदान जाहीर केला. पारेषण कंपनीने सप्टेंबरच्या मध्ये तर निर्मिती व वितरण कंपनीने ऑक्टोंबर -२०२६ मध्ये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतलाआहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या निर्मिती,पारेषण,वितरण या वीज कंपन्या ची सन २०२५ -२०२६ या वर्षात आर्थिक वर्षात वीज निर्मिती कंपनीने स्थापित क्षमतेचा पूर्ण वापर करून ७०६३.३९ MUS ऐवढी विक्रमी वीज निर्मिती केली. निर्मिती कंपनीने मागील आर्थिक वर्षात रू.३९,५७६ .२४ कोटी महसूल मिळविला व रू.३८,८४४.८१ एवढा खर्च झाला.त्यामुळे निर्मिती कंपनीस आर्थिक वर्षात रु.७२२.४२ कोटी नफा झाला.नफ्यामधून टॅक्स भरणा रू.२७०.४४ कोटी केल्यानंतर निर्मिती कंपनीस निवड नफा रु.४५१.९८ कोटी झालेला आहे.पारेषण कंपनीस सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये एकूण महसूल रू.११,१४४ कोटी प्राप्त झाला.रु.७,०५७ कोटी खर्च झाला, कंपनीने रुपये रू.१,६४९ कोटी टॅक्स भरल्यानंतर कंपनीत निवड नफा रु.२,४३८ कोटी मिळालेला आहे.

       



महावितरण कंपनीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये एकूण महसूल रू.१,३४,५६०.९७ कोटी प्राप्त झाला.रु.१,३३,३२६.७२ कोटी खर्च झाला,कंपनीस रू.१२३४.१६ कोटी निवड नफा झालेला आहे.महसुलामध्ये अतिशय चांगली प्रगती केलेली आहे. वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगार व वीज ग्राहकास प्रशिक्षित करून अपघात कमी करण्याकरिता केलेल्या उपाययोजना,राज्यातील शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप योजना राबवून केलेला जागतिक विक्रम अशा अनेक कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार वितरण कंपनीस प्राप्त झालेले आहे. वरील लक्ष गाठण्याकरिता तिन्ही वीज कंपन्या मधील कर्मचारी,अभियंते,अधिकारी, सहाय्यक व कंत्राटी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे.

तिन्ही वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी केलेली सर्वोत्तम कामगिरी व मिळवलेला नफा विचारात घेऊन कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी रू.२५,००० सानुग्रह अनुदान/ बोनस द्यावा अशी मागणी मा. अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) यांना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे कॉम्रेड मोहन शर्मा अध्यक्ष व कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस यांनी पत्राद्वारे केलेली आहे.
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.