Press "Enter" to skip to content

ओरिएंटल इन्शुरन्सच्या डिजिटल एक्सप्रेस कॉर्नरचे पनवेलमध्ये उद्घाटन ; विमा सेवा अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती


पनवेल, दि.७ (वार्ताहर) : द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या पनवेल विभागात एजंट डिजिटल एक्सप्रेस कॉर्नरचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. प्रतीक राजूभाई शाह यांच्या एजन्सीअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या डिजिटल एक्सप्रेस कॉर्नरचे उद्घाटन प्रादेशिक व्यवस्थापक सुरेश अढाव यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमामुळे विमा सेवांशी संबंधित विविध सुविधा अधिक सुलभ आणि आधुनिक पद्धतीने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. डिजिटल माध्यमातून ग्राहकांना जलद आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला प्रादेशिक व्यवस्थापक नवीन सर, निथिलेश चौबे, राजेश, उमेश शुक्ला, मनीषा कोळी, उदय काठे, दीपक बोबडे, नामदेव ढोले, संजय शिर्के, विपिन नौसारीवाला, राजूभाई शाह यांच्यासह अनेक एजंट आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी या नव्या डिजिटल उपक्रमाचे स्वागत करत प्रतीक शाह यांचे अभिनंदन केले. ग्राहकांना अधिक प्रभावी आणि सुलभ विमा सेवा देण्यासाठी डिजिटल एक्सप्रेस कॉर्नर उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.