Press "Enter" to skip to content

जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आवरेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेते पदाची हॅट्रिक


प्रतिनिधी आवरे (सचिन पाटील) शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासक्रम व खेळ हे एकमेकांना पूरक असतात खेळ आणि आपले शरीर यांच्या दृढ संबंध आहे .शरीराला योग्य तंदुरुस्ती कडे नेण्यासाठी व्यायामांसोबत खेळाची आवश्यकता असते क्रीडा युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी आयोजित श्रीमती भागूबाई चांगु ठाकूर माध्यमिक विद्यालयात येथे पार पडलेल्या तालुका तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरे विद्यालयाने विजेते पदाची हॅट्रिक मारली आहे.

सदर स्पर्धेमध्ये तिन्ही वयोगटात (अंडर 14) वयोगट( अंडर17) व वयोगट (अंडर19) या फॉरमॅट मध्ये जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी कबड्डी या स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत विजयश्रीची माळ आपल्या गळ्यात घातली आहे आणि सदर विद्यार्थ्यांचे निवड ही जिह्यास्तरावर झाली आहे हे विशेष होय अशा पद्धतीने संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व जे आहे ते जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरे च्या विद्यार्थ्यांनी राखले जिद्द, मेहनत चिकाटी व आपल्या ध्येयावर एकाग्रता ठेवल्याने सर्व काही होत असते याचा मूर्तीमध्ये उदाहरण म्हणजेच जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी होय म्हणजेच या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या क्रीडात्मक दर्जा हा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षक शुभम ठाकूर सर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रतिक ठाकूर सर, विश्वस्त श्री वामन ठाकूर सर, विश्वस्त सौ अलका ठाकूर , मॅडम सिंधु ठाकूर मॅडम विश्वस्त प्रसाद ठाकूर सर आदिनाथ ठाकूर सौ रीना ठाकूर मॅडम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कौतुक केलेले आहे विद्यार्थ्यांनी मिळालेले यश हे आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक जनार्दन ठाकूर सर यांना अर्पण केलेले आहे अशा पद्धतीने जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरेची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेते पदाची हॅट्रिक

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.