Press "Enter" to skip to content

प्रदीप केसरीनाथ ठाकूर यांची महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघ मुंबई शहर जिल्हा अध्यक्षपदी निवड

मुंबई शहरातील कुस्ती, आखाडे, तालमी आणि नवोदित पैलवानांना प्रोत्साहन देण्यावर भर

मुंबई : महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्तीला संघटित स्वरूप देत तिच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्ती- मल्लविद्या महासंघाच्या मुंबई शहर जिल्हा अध्यक्षपदी मा. श्री. प्रदीप केसरीनाथ ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मुंबई शहरातील कुस्ती क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध आखाडे, तालमी, पैलवान तसेच कुस्तीप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रदीप केसरीनाथ ठाकूर हे कुस्ती क्षेत्राशी सातत्याने जोडलेले असून, पारंपरिक मल्लविद्येचा वारसा जपण्यासोबतच नवोदित पैलवानांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत, मुंबईसारख्या महानगरात कुस्तीची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी आखाडे व तालमींना प्रोत्साहन देणे, युवा पैलवानांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे आणि विविध कुस्ती स्पर्धींचे आयोजन व प्रसार करणे, या माध्यमातून कुस्ती चळवळीला नवी दिशा देण्याचा त्यांचा मानस आहे.

मुंबई शहरात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले अनेक कुस्तीपटू वास्तव्यास असून, त्यांच्यातील गुणवंत खेळाडूंना योग्य संधी मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नवोदित तसेच अनुभवी पैलवानांना प्रोत्साहन देऊन मुंबई शहरातील कुस्ती क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे प्रदीप ठाकूर यांनी सांगितले.

महासंघाच्या माध्यमातून पारंपरिक कुस्ती, मल्लविद्या आणि आखाडा संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच आधुनिक काळातील क्रीडा व्यवस्थापनाशी सांगड घालण्यावरही भर दिला जाणार आहे. मुंबई शहरातील विविध तालमी, आखाडे, कुस्ती संघटना, पंच, वस्ताद आणि पैलवान यांना एका व्यासपीठावर आणून कुस्तीच्या विकासासाठी व्यापक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्रदीप केसरीनाथ ठाकूर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघांचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यांतील कुस्तीप्रेमी, वस्ताद, पंच आणि पैलवानांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरातील कुस्तीला नवी ऊर्जा मिळेल आणि आगामी काळात अनेक गुणवंत पैलवान घडतील, असा विश्वास कुस्ती क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.