Press "Enter" to skip to content

नागोठणे रिलायन्स कंपनीकडून येणाऱ्या टँकर वाहनावरून चालकाचा ताबा सुटल्याने अंबा नदी पुलावर मोठा अपघात

नागोठणे प्रतिनिधी : याकुब सय्यद

सविस्तर वृत्त असे की नागोठणे आंबा नदी पुलावर आज सकाळी सात वाजल्याच्या सुमारास एका केमिकल टँकर क्रमांक N C 01 A F 2697 एन सी ०१ ए फ २६९७ हा रिलायन्स कंपनीकडून भरधाव वेगाने येत असताना टँकर चालकाचा त्याच्या वाहनावरून ताबा सुटल्याने टँकर हा पुलाच्या संरक्षण कठाळ्याला जाऊन धडकला परंतु अंबा नदीच्या पुलाचे संरक्षण कठाडे मजबूत असल्याने व टँकर हा रिकामा असल्याने टँकर हा आंबा नदीमध्ये जाता जाता बचावला सुदैवाने कोणती ही जीवित हानी झाली नाही.

रिलायन्स कंपनीने नागोठणे स्थानिक पोलीस ठाण्याला पाचरण करणे गरजेचे होते. कारण रस्ता सुरक्षेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता रिलायन्स कंपनीने स्वतःच्या युक्तीने व युद्ध पातळीने रिकामा असलेला केमिकल टँकर बाहेर काढला त्यावेळी रस्त्यावर खूप मोठी वाहनांची गर्दी झाली होती.

जवळ जवळ दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या नागोठणे पोलीस ठाणे यांना आंबा नदीवर टँकरचा अपघात झाल्याची खबर लागताच नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.