
पनवेल (प्रतिनिधी) पनवेलमधील युवा कलाकार कु. श्लोक शैलेश चौधरी याने ‘3:30’ या लघुपटाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये आपल्या कलेची दखल मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्लोकचे व त्याच्या आई वडिलांचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘3:30’ या लघुपटाची निवड अमेरिकेतील Tasveer Film Festival – Seattle, DC South Asian Film Festival – Washington D.C. आणि South Asian Film Festival – Chicago या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्ससाठी झाली आहे. तसेच या लघुपटाचा World Premiere ऑगस्ट २०२६ मध्ये झालेल्या Bengaluru International Short Film Festival (BISFF) येथे झाला.
ही भेट मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी घडवून दिली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्लोकशी संवाद साधत त्याच्या कलाप्रवासाबद्दल तसेच भविष्यातील वाटचालीबद्दल जाणून घेतले. पनवेलच्या युवा कलाकाराने आपल्या कर्तृत्वातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्थान मिळवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत श्लोकला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.


Be First to Comment