Press "Enter" to skip to content

पेणच्या माजी एसटी कर्मचा-याची मुलगी ‘कोण होणार करोडपती’ मध्ये दाखल

पेण, ता. २४ (वार्ताहर) : जगप्रसिद्ध सुरू असणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ या सोनी मराठी चैनल वरील खेळामध्ये पेण येथील माजी एसटी कर्मचारी जी.एम.पाटील यांची कन्या निकिता ही यामध्ये दाखल झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माजी एस.टी.कर्मचारी व राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे रायगड विभागीय सचिव गजानन मोतीराम पाटील यांची जेष्ठ कन्या निकिता हिचे लग्न होऊन ती आता सौ.निकिता समीर वेढीकर या सध्या कुटुंबीयासह वाकड पुणे येथे राहत असून निकिता हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पेण येथे झालेले आहे. त्यानंतर आय.टी.इंजिनिअरिंगचे शिक्षण त्यांनी पुणे येथे घेतले तीथेच एका कंपनी मार्फत त्यांनी इंगलड, इटली, स्पेन या देशात कामगिरी केली आहे.

पहिल्यापासूनच हुशार असणाऱ्या निकिताने जगप्रसिद्ध असणाऱ्या कोण होणार करोडपती या खेळामध्ये सामील झाल्याने तिला सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याबरोबर हॉट सीटवर बसण्याची संधी प्राप्त झाली आहे.त्यामुळे निकिताला मिळालेल्या या संधीचं ती कुठल्या प्रश्नांपर्यंत मजल मारून सोनं करते हेच पाहणे आता गरजेचे ठरणार असून सदर खेळाचे प्रक्षेपण दि. २७ आणि ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे त्यामुळे ती या खेळामध्ये दाखल झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.