Press "Enter" to skip to content

११३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कामोठ्यात भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबिर संपन्न

मावळा ब्रिगेड (नवी मुंबई), मैत्र प्रतिष्ठान (घोडपदेव–भायखळा) आणि एम.एस.पी. फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर व मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. प्रशांतदादा ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. विकासशेठ घरत, तसेच डॉ. विठ्ठल काळे – युनिट प्रमुख, कान-नाक-घसा तज्ञ व Head & Neck Cancer Specialist, जे. जे. शासकीय रुग्णालय, मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी श्री. बलराज गणपत साळोखे, श्री. नाना मगदूम (अध्यक्ष, व्यापारी संघटना कामोठे), मावळा ब्रिगेडचे मार्गदर्शक श्री. गणेशशेठ बेरगळ, अ‍ॅड. रवी कदम, सल्लागार श्री. पवनकुमार बेरगळ, श्री. पांडुरंग यमगर, अ‍ॅड. कपिल शेटे, श्री. हेमंत गायकवाड, श्री. सुशांत काटकर, श्री. कैलाश सरगर, तसेच जे. जे. रुग्णालयाचे MSW श्री. कदम साहेब, श्री. शिंदे आणि रावसाहेब बुधे उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमाला विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मावळा ब्रिगेडचे शिलेदार, एम.एस.पी. फाउंडेशनचे संस्थापक श्री. मायाप्पा बुधे सर, मैत्र प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. विशाल बाबर आणि अनेक हितचिंतकांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.

या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल ११३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर असंख्य नागरिकांनी मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. रक्तदानातून जीवनदान आणि आरोग्य तपासणीतून आरोग्य संवर्धन असा दुहेरी सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाची माहिती मावळा ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष श्री. संदिप वावरे यांनी दिली. संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सेक्रेटरी श्री. लक्ष्मण कारंडे, खजिनदार श्री. महेंद्र हिरे आणि कार्याध्यक्ष श्री. दिनेश निलख यांनी दिली.

संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती उपाध्यक्ष श्री. योगेश निलख, उपसेक्रेटरी श्री. राजेंद्र गडदे, उपखजिनदार श्री. गणेश शिंदे, श्री. सचिन शेंबडे, उपकार्याध्यक्ष श्री. संदिप नलावडे आणि श्री. रोहित कोळेकर यांनी उपस्थितांना दिली.

या वेळी मावळा ब्रिगेडचे ब्रह्मा कारंडे, नितेश वाझे, सचिन गोरड यांच्यासह सर्व शिलेदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मावळा ब्रिगेडचे ज्येष्ठ शिलेदार श्री. राजाराम पाटील यांनी प्रभावीपणे केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.