
खारघर : प्रतिनिधी
सुवर्ण मंदीर अमृतसर पंजाब च्या पावनभुमीत दि 18 ते 21,2026 ला झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत खारघर ची कन्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने सिल्वर पदक प्राप्त केले आहे.
याअगोदर सस्नेह ने शालेय सायकलिग अजिक्य स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर दोन सुवर्ण पदक प्राप्त केली आहेत अनेक राष्ट्रीय स्पर्धेत सस्नेह ने अनेक पदक याअगोदर प्राप्त केले आहे स्नेहल चे वडिल हे सध्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक यापदावर नवी मुंबईत कार्यरत आहेत सध्या बालवाडीत फिनिक्स सायकलिंग अँकेडिमीचे चे प्रशिक्षक दर्शन बारगुजे यांचे मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग करीत आहे.
सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष अॅड विक्रम रोठे,उपाध्यक्ष अविनाश कदम, ,सचिव प्राध्यापक संजय साठे सर यांनी कौतुक केले आहे तसेच आमदार प्रशांत ठाकुर व नगरसेवक मधु पाटील, प्रविण पाटील ,ब्रिजेश पटेल ह्यांनी आभिनंदन केले आहे



Be First to Comment