
पुणे, दि. ५ ऑक्टोबर २०२६ :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) क्रीडा सेलच्या वतीने संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने विविध पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये विजय रमेश बामुगडे यांची पर्वती मतदार संघ क्रीडा संघटक, म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार क्रीडा क्षेत्रातील संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक तसेच विविध क्रीडा संघटनांशी समन्वय साधून क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि अधिकाधिक युवकांना क्रीडा क्षेत्राशी जोडण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल विजय रमेश बामुगडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
या वेळी नियुक्तीपत्र प्रदान करताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा सेलचे अध्यक्ष डॉ. मदन कोठुले, पुणे शहर पश्चिम विभागाचे अध्यक्ष विशाल तांबे आणि पुणे शहर पूर्व विभागाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील उपस्थित होते.


Be First to Comment