Press "Enter" to skip to content

ॲसिडिटीचा त्रास ? शरद ऋतूत ही काळजी घ्या !

आयुर्वेदाच्या ‘ऋतूचर्या’ या संकल्पनेत शरद ऋतूचे वर्णन पित्त प्रकोपाचा काळ (पित्त वाढण्याचा काळ) म्हणून केले आहे. जाणून घ्या “उपाय”

१. शरद ऋतूत नेमके काय घडते ?

‘पावसाळ्यात शरिरात संचित झालेले पित्त शरद ऋतूतील कडक ऊन आणि हवामानातील पालट यांमुळे प्रकुपित होते (भडकते)’, असे आयुर्वेद सांगतो. त्यामुळे ज्यांची प्रकृती पित्तप्रधान आहे किंवा ज्यांना आधीपासूनच पित्ताचा त्रास आहे, त्यांच्यामध्ये या काळात पुढील लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येऊ शकतात –

अ. ‘ॲसिडिटी’ (आम्लपित्त)

आ. छातीत जळजळ किंवा शरिरात उष्णता जाणवणे

इ. आंबट ढेकर येणे

ई. अतीप्रमाणात तहान लागणे

उ. त्वचेच्या काही तक्रारी

ऊ. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये अस्वस्थता वाढणे

२. ‘ॲसिडिटी’चा त्रास असणार्‍यांनी काय काळजी घ्यावी ?

शरद ऋतूत पित्त वाढण्याच्या शक्यतेमुळे काही लोकांमध्ये आम्लपित्ताची लक्षणे तीव्र होऊ शकतात. त्यामुळे

अ. अती तिखट, आंबट आणि खारट पदार्थ खाणे मर्यादित ठेवा.

आ. अतीतेलकट आणि पचायला जड असलेले अन्न टाळा.

इ. जेवणाच्या वेळा नियमित ठेवा.

ई. भूकेपेक्षा अधिक खाणे टाळा.

उ. पुरेशी झोप आणि विश्रांती याकडे लक्ष द्या.

ऊ. कोणते अन्नपदार्थ स्वतःच्या शरिराला मानवत नाहीत, याचे निरीक्षण करा.

असे असले, तरी वारंवार तीव्र ‘ॲसिडिटी’, छातीत जळजळ, उलट्या होणे, गिळतांना त्रास होणे, पोटात तीव्र वेदना किंवा इतर कोणतीही लक्षणे दीर्घकाळ टिकून रहात असतील, तर त्याला केवळ ‘ऋतू पालटाचा परिणाम’ समजून दुर्लक्ष करू नका, त्वरित तज्ञ वैद्यांचा सल्ला घ्या.

शरद ऋतूतील पित्त प्रकोपाची शक्यता ओळखून त्यानुसार योग्य आहार-विहाराचे पालन करा आणि आवश्यकतेनुसार तज्ञ आयुर्वेद वैद्यांचा सल्ला घ्या.

लक्षात ठेवा, ‘ऋतू पालटतो, शरीरही पालटते. शरिरातील पालट समजून घेणे, हीच निरोगी आरोग्याची पहिली पायरी आहे.’

– वैद्या (कु.) नित्यश्री वाय्., श्री शारदा आयुर्वेदालय, होळेहोन्नूरु, शिवमोग्गा, कर्नाटक.

टीप : येथे दिलेले उपाय अवलंबण्यापूर्वी आपल्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.