Press "Enter" to skip to content

युवासेना पनवेल विधानसभा आयोजित किल्ले स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात संपन्न !

न्यू पनवेल येथील उत्सव रिलायन्स मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक; महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रथमेश सोमण यांची प्रमुख उपस्थिती !

पनवेल, दि. २२ नोव्हेंबर २०२६ : युवासेना पनवेल विधानसभा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण समारंभ आज शिवसेना पनवेल शहर शाखा येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये न्यू पनवेल येथील उत्सव रिलायन्स मंडळाने आपल्या उत्कृष्ट किल्ले प्रतिकृतीद्वारे प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला.

सदर कार्यक्रमास यशस्वीरीत्या परीक्षण करून सुदीपजी आठवले यांच्या परीक्षणानुसार मराठा वॉरीयर्स, आसुडगाव ह्यांनी द्वितीय तर बालेकिल्ला मित्र मंडळ,आदई ह्यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. त्याचबरोबर अपेक्षा किल्ला प्रतिष्ठान,आकुर्ली तसेच श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, कळंबोली ह्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचा वैभवशाली वारसा आणि महाराष्ट्राची समृद्ध दुर्गसंस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तसेच तरुणांमध्ये इतिहासाविषयी आवड, जागरूकता आणि अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने युवासेना पनवेल विधानसभा यांच्या वतीने या किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये विविध मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या. किल्ल्यांची रचना, ऐतिहासिक संदर्भ, स्थापत्यकलेचे बारकावे आणि सर्जनशीलता यांचा सुंदर मिलाफ या प्रतिकृतींमध्ये पाहायला मिळाला. सहभागी मंडळांनी घेतलेली मेहनत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाप्रती असलेली निष्ठा यामुळे स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली.

सदर बक्षीस वितरण समारंभाला महानगरप्रमुख तथा नगरसेवक श्री. प्रथमेश सोमण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रम युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा संपर्कप्रमुख अभिनय सोमण तसेच सहकारी विधानसभा अध्यक्ष जय कुष्टे, पनवेल तालुका अध्यक्ष ऋषिकेश सोगे, महानगर सचिव विराज साळवी आणि उपमहानगर अध्यक्ष प्रज्योत पाटील आदींनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन तथा नियोजन केलं होते.

सदर कार्यक्रमास शिवसेना उप-तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, युवासेना रायगड जिल्हाध्यक्ष रोशन पुजारी, महानगर अध्यक्ष प्रेम ठाकूर यांची उपस्थिती लाभली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, किल्ले स्पर्धेसारख्या आयोजनातून केवळ मनोरंजन होत नाही, तर तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची संकल्पना आणि गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजण्यास मदत होते. तसेच अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये संघभावना, सामाजिक बांधिलकी, कल्पकता आणि आपल्या ऐतिहासिक वारशाप्रती अभिमान निर्माण होतो.

युवासेना पनवेल विधानसभा यांच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मंडळांचे, स्पर्धकांचे, आयोजकांचे, पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. भविष्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आणि महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

गड-किल्ले हे केवळ दगड-मातीच्या वास्तू नसून ते आपल्या स्वाभिमानाचे, पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत. हा ऐतिहासिक वारसा जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच या उपक्रमामागील खरी प्रेरणा आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.