Press "Enter" to skip to content

भोरगाव लेवा पाटीदार पंचायत पाडळसे, मुंबई विभाग यांच्या वतीने आयोजित ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान नऊ महिलांचा गौरव; अंबरनाथ व परिसरातील सुमारे १०० समाजबांधवांची उपस्थिती

अंबरनाथ 🙁 सुनील इंगळे /पी.डी.पाटील) भोरगाव लेवा पाटीदार पंचायत पाडळसे, समुपदेशन समिती विभाग मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ हा गौरव सोहळा रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी अंबरनाथ पूर्व येथील सोनम क्लासेस, गुरुदेव अपार्टमेंट, स्टेशन रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

मुंबई विभागातील समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याचा समाजासमोर आदर्श ठेवणे आणि महिला सक्षमीकरणाला बळ देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून आमंत्रित असलेले श्री. ललितदादा रमेश पाटील (कुटुंब नायक), ॲड. श्री. संजय राणे (कार्यकारी सचिव) तसेच प्रमुख पाहुण्या सौ. जयश्री अमोल जावळे हे काही अपरिहार्य कारणांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी आयोजकांना शुभेच्छा संदेश पाठवून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सोपान इंगळे (संस्थापक, लेवा पाटील समाज मंडळ, अंबरनाथ), डॉ. श्री. गुणवंत भंगाळे (अध्यक्ष, लेवा पाटील समाज मंडळ, अंबरनाथ), डॉ. श्री. विवेक महाजन (कार्डिओलॉजिस्ट, डोंबिवली), सौ. मनीषा ताई कोल्हे (निर्माती, दिग्दर्शिका, अभिनेत्री व उद्योजिका) आणि श्री. विजय रामा वराडे (सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक) यांची उपस्थिती लाभली.

या पुरस्कार सोहळ्यात खालील नऊ महिलांचा सन्मान करण्यात आला.

१. उद्योजिका पुरस्कार – सौ. दिपाली दीपक तळेले (मीरा-भाईंदर)
२. आरोग्य नारी सेवा पुरस्कार – डॉ. सौ. अनुप्रिता पराग पाटील (ठाणे)
३. ज्येष्ठ कर्तृत्ववान महिला पुरस्कार – सौ. मधुबाला जंगले (कुर्ला)
४. समाजसेवा पुरस्कार – सौ. उर्मिला मोहन चौधरी (डोंबिवली)
५. युवा नारीशक्ती पुरस्कार – सौ. प्रियंका किरण चौधरी (बदलापूर)
६. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार – सौ. मृणालिनी लिलाधर महाजन (कल्याण)
७. कला संस्कृती पुरस्कार – कु. नेहा हेमंत तळेले (विक्रोळी)
८. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार – सौ. छाया वैभव कोल्हे (डोंबिवली)
९. महिला संघटना पुरस्कार – सौ. तिलोत्तमा किशोर बोंडे (ठाणे)
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी त्यांची मनोगते व्यक्त केली त्यामध्ये श्रीयुत गुणवंत भंगाळे सर यांनी असे सांगितले की, सर्वांना एकत्रित घेऊन समाज विकास कसा करता येईल आणि सर्वांनी त्यासाठी एकत्र यावे असे आव्हान केले.
डॉ. विवेक महाजन यांनी आपल्या मनोगतात महिला आपल्या स्वतःचे दुखणे बाजूला ठेवून कुटुंबीयांच्या दुखण्याकडे आधी लक्ष देतात .यापुढे त्यांनी प्रथम स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे तेव्हाच त्या कुटुंबीयांच्या बाबतीत लक्ष देऊ शकतील.
सौ मनीषाताई कोल्हे यांनी
म्हटल्या जेव्हा समाज आपली दखल घेतो तेव्हा आनंद द्विगुणित होतो व इतराना सुद्धा प्रेरणा मिळते.
शेवटी अध्यक्षीय मनोगतामध्ये श्रीयुत सोपान इंगळे सर म्हणाले कार्यक्रम खूपच सुंदर झालेला आहे आज ज्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्यांच्यापासून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल व त्यांनी
इतर महिलांना सुद्धा आपापल्या क्षेत्रात तयार करावे.
राजेंद्र झोपे सरांनी आपल्या निवेदनात हॉलमधील सर्व उपस्थितांना खिळवून ठेवले व कंटाळा येणार नाही अशा पद्धतीने कार्यक्रमात मध्ये मध्ये उदाहरणे देऊन मनोरंजकता आणली.यावेळी नवदुर्गा सन्मान पुरस्कारार्थी महिलांचा परिचय सौ. स्मिता चौधरी यांनी करून दिला

या संपूर्ण कार्यक्रमाला अंबरनाथ तसेच परिसरातील जवळपास १०० समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे, पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व नवदुर्गांनी समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केल्याबद्दल भोरगाव लेवा पाटीदार पंचायत व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजाकडून मिळालेला हा सन्मान भविष्यात आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित पंचायत पदाधिकारी, पंचायत सदस्य आणि लेवा पाटील समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही महिलांसाठी असेच नाविन्यपूर्ण, प्रेरणादायी आणि उत्कृष्ट उपक्रम व कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातील, अशी ग्वाही दिली. महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत आणि समाज मंडळ नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल, असेही त्यांनी सांगितले.

या पुरस्कार सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी समुपदेशन समिती, मुंबई विभागाच्या सर्व सदस्यांनी विशेष सहकार्य केले. तसेच युवा समिती, मुंबई विभाग आणि युवा समिती अंबरनाथ शहराच्या पदाधिकारी व सदस्यांनी नियोजन, आयोजन आणि व्यवस्थापनासाठी विशेष मेहनत घेतली. सर्वांच्या समन्वयातून हा सोहळा अतिशय सुंदर, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ हा उपक्रम समाजातील महिलांना नवी प्रेरणा देणारा ठरला. अशा उपक्रमांमुळे महिलांना समाजासमोर आपले कर्तृत्व मांडण्याची संधी मिळते, त्यांच्या कार्याला योग्य सन्मान मिळतो आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अधोरेखित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व पुरस्कारार्थी, उपस्थित मान्यवर, समाजबांधव, समुपदेशन समिती सदस्य, पंचायत सदस्य, लेवा पाटील समाज मंडळाचे पदाधिकारी, युवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.