Press "Enter" to skip to content

शिवसेना जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर यांचे विसरलेले २५ हजार रुपये परत ; प्रामाणिक रिक्षाचालक रामा जोशी यांचा सत्कार


पनवेल : ​आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी युगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणारी एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. रिक्षाचालक रामा जोशी (रिक्षा क्रमांक MH.46.AC 2997) यांनी आपल्या रिक्षात विसरलेले २५ हजार रुपये रोख असणारे पाकीट सुरक्षितपणे मूळ मालकास परत करून समाजासमोर प्रामाणिकपणाचा एक उत्तम आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे.
​

शिवसेना जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर हे लाईन आळीतून कल्पतरू सोसायटी येथे प्रवास करत असताना त्यांचे २५ हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट अनावधानाने रिक्षातच विसरले होते. ही बाब लक्षात येताच रिक्षाचालक रामा जोशी यांनी कोणताही मोह न बाळगता ते पाकीट सुरक्षितपणे रमेश गुडेकर यांच्या स्वाधीन केले.
​

रामा जोशी यांच्या या निस्वार्थी आणि प्रामाणिक वृत्तीची दखल घेत शिवसेना जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील, संयुक्त चिटणीस प्रशांत नरसाळे, कार्याध्यक्ष समीर कदम आणि संतोष तळेकर उपस्थित होते. कर्तव्याशी आणि नैतिकतेशी बांधील राहून प्रामाणिकपणा जपणारे रिक्षाचालक रामा जोशी यांच्या या कौतुकास्पद कृतीचे सर्व स्तरातून मनापासून अभिनंदन व कौतुक होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.