Press "Enter" to skip to content

वरोसे येथे जे.एस.एस. रायगडतर्फे कापडी पिशवी वाटप व स्वच्छता जनजागृती

रसायनी — राकेश खराडे

सामान्य नागरिकांमध्ये स्वच्छता, आरोग्य, विविध शासकीय योजना तसेच कौशल्य विकासाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जन शिक्षण संस्थान (जे.एस.एस.) रायगड यांच्या वतीने गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील वरोसे येथे ‘कापडी पिशवी वाटप व स्वच्छता जनजागृती’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थींना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्लास्टिकचा वापर टाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित प्रशिक्षणार्थींना कल्पना म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर आणि संचालक डॉ. विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत विविध स्वच्छताविषयक जनजागृती कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार’ यांच्या विशेष पुढाकारातून जन शिक्षण संस्थान रायगडमार्फत मागील २१ वर्षांपासून रायगड जिल्ह्यात व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य सुरू आहे. आतापर्यंत ८० हजारांहून अधिक लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती संचालक डॉ. विजय कोकणे यांनी दिली.

स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वरोसे येथे हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे, प्रशिक्षिका सारिका सांगळे तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. उपक्रम उत्साहात पार पडला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.