
पेण, दि. 30 (वार्ताहर) – : गणपती मूर्तीचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब म्हणून जोहे ओळखू लागले आहे.या गावात साखरचौथ निमित्त जोहेच्या राजाची पाच दिवसांसाठी स्थापना करण्यात आली असून याकरीता वंदे मातरम् स्कुल व न्यू इंग्लिश स्कुल जोहे येथील असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत पहिली महाआरती केली आहे.
वर्षभर गणेश मूर्ती बनविण्यात मग्न असणाऱ्या पेण तालुक्यातील जोहे गावातील जेष्ठ, महिला व युवा वर्गाला या साखर चौथ गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, पनवेल, उरण आदी तालुक्यात घरगुतीसह सार्वजनिक साखरचौथ गणपती मोठ्या प्रमाणात स्थापन केले जातात 2013 साली स्थापन झालेल्या या जोहेचा राजा गणेशोत्सवानिमित्त शाळेय विद्यार्थी दत्तक घेणे, वह्या वाटप, महिलांसाठी वेगवेगळे शिबीर, रक्तदान शिबिर आयोजित करणे आदी सामाजिक कार्यात सदर प्रतिष्ठान काम करत आहे.त्यामुळे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी जोहेचा राजा पाच दिवसांसाठी विराजमान झाला आहे.
या दरम्यान जोहेचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक देवा पेरवी, अध्यक्ष विनोद म्हात्रे, सल्लागार नारायण म्हात्रे, कार्याध्यक्ष वैभव धुमाळ, कमलाकर बोरकर, रवींद्र रसाळ, धनंजय पाटील, दीपक पाटील, निनाद धुमाळ आदी मान्यवरांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात.



Be First to Comment