Press "Enter" to skip to content

कर्मवीरांनी माणूस घडविण्याचे काम केले : प्रशांत देशमुख

महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात साजरी

पनवेल : महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आणि ‘कमवा आणि शिका’ या उपक्रमाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये समता, श्रमाचे महत्त्व, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजविण्याचे महान कार्य कर्मवीरांनी केले, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. नेमबाजीत आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या पार्थ माने याला रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे ₹१ लाख, तर महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे ₹५० हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे रोख पारितोषिके देऊन प्रोत्साहन देण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या यशाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.