Press "Enter" to skip to content

जवाद काझी यांची अँग्लो उर्दू हायस्कूलच्या अध्यक्षपदी निवड


पनवेल, दि.२९ (वार्ताहर) : पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू हायस्कूल, बारापाडाच्या अध्यक्षपदी जवाद काझी यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पनवेल महानगरपालिकेचे मा.नगरसेवक अब्दुल मुकीत काझी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जवाद काझी यांच्या हातून उत्तम कार्य घडावे, अशी सदिच्छा अब्दुल मुकीत काझी यांनी व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या विकासाला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.