
सारडे :प्रतिनिधी (नागेंद्र म्हात्रे) आजच युग हे संगणक प्रणाली च आहे या युगात एखाद्या ला संगणक येत नसेल तर तो साक्षर असून निरक्षर गणला जातो म्हणजे आधुनिक युगात संगणक ज्ञान हे खूप महत्वाचे आहे यासाठी आधुनिक युगातील तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, तसेच नवनवीन अभ्यासक्रम आणि शैक्षणिक विषय साध्या व सोप्या पद्धतीने समजावून घेता यावेत, या उद्देशाने इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाउनटाउन यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, सारडे येथे संगणक भेट देण्यात आला.
या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन क्लब अध्यक्षा हेतल खोना, क्लब सचिव भारती विक्रमसी, क्लब मेंबर आशिता दावडा, मिनल शहा यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व नियोजनातून करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाउनटाउन: अध्यक्षा हेतल खोना, सेक्रेटरी भारती विक्रमसि, क्लब मेंबर आशिता दावडा, मिनल शहा
आकाश फाउंडेशन मुंबई सेक्रेटरी संजीवनी श्रृंगारे, सारडे ग्रामपंचायत सरपंच रोशन पाटील, मुख्याध्यापिका समृद्धी वऱ्हाडी, शिक्षिका अपूर्वा घरत, रश्मी पवार, वनिता पाटील, सारडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, कृषी मित्र प्रकाश माळी, हॉटेल MDS चे मालक नितीन म्हात्रे, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे जयेश म्हात्रे,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक म्हात्रे, उपाध्यक्ष उज्वला पाटील, सदस्या पूनम पाटील, कविता म्हात्रे, मंगेश पाटील, मदतनीस
ज्योत्स्ना पाटील तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते

यावेळी मनोगत व्यक्त करताना इन्नर व्हील क्लबच्या अध्यक्षा हेतल खोना म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे आणि आधुनिक तंत्रज्ञान माहिती-तंत्रज्ञानाचे ज्ञान त्यांना मिळावे, यासाठी इन्नर व्हील क्लब सातत्याने प्रयत्नशील आहे.
याप्रसंगी त्यांनी इन्नर व्हील क्लबच्या विविध सामाजिक कार्यांची सविस्तर माहिती देत, आजच्या आधुनिक युगात तंत्रशिक्षणाची गरज अधोरेखित केली. “समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक ती मदत करणे आणि निःस्वार्थ भावनेने सेवा देणे, हाच आमच्या क्लबचा प्रमुख उद्देश आहे.” या स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाबद्दल शाळेच्या शिक्षिका अपूर्वा मॅडम यांनी इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाउनटाउनच्या अध्यक्षा हेतल खोना सेक्रेटरी भारती विक्रमसि, क्लब मेंबर आशिता दावडा, मिनल शहा
आकाश फाउंडेशन मुबई सेक्रेटरी संजीवनी श्रृंगारे आणि नागेंद्र म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले.
अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सारडे विकास मंच आणि रायगड जिल्हा परिषद शाळा, सारडे यांच्या वतीने या सामाजिक उपक्रमासाठी इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाउनटाउन, आकाश फाउंडेशन मुंबई आणि सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले.



Be First to Comment