Press "Enter" to skip to content

पनवेलच्या ‘बाप्पा मोरया’ पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५५ हून अधिक स्पर्धकांचा सहभाग; सर्व सहभागींचा चषक व प्रमाणपत्र देऊन गौरव

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या वतीने सन्माननीय सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘बाप्पा मोरया’ घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाचा आनंद साजरा करताना पर्यावरणाचे भान जपावे आणि नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश होता.

पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक १४, १८, १९ आणि २० मधील रहिवाशांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ५५ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपल्या घरातील गणरायाची आकर्षक, कल्पक आणि पर्यावरणपूरक सजावट साकारली. गणपती सजावटीसाठी थर्मोकॉलच्या वस्तूंच्या वापरास सक्त मनाई करण्यात आली होती. त्याऐवजी नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. स्पर्धकांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विविध संकल्पना, कल्पकता आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर मिलाफ साधत सजावटी साकारल्या. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरांत पोहोचण्यास मदत झाली.

 या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांची भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंझारराव, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रभाग १४ अध्यक्ष गणेश म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हा माजी उपाध्यक्ष चिन्मय समेळ आणि पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिकरीत्या भेट घेऊन त्यांना सहभाग चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविले.  स्पर्धेतील अंतिम निकाल पुढील काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहेत. विजेत्यांना एकूण २५ हजार रुपयांपर्यंतची आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक व पर्यावरणीय जाणीवा निर्माण करणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून अधोरेखित केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.