Press "Enter" to skip to content

श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश ; मनोर गोरे यांच्या नेतृत्वावर तसेच आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत पक्षप्रवेश

रोहा : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विरजोली ग्रामपंचायतीमधील विरजोली गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तरुण तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला.

युवा नेतृत्व मनोर गोरे यांच्या नेतृत्वावर तसेच दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी विरजोली गावातील तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्वीकारत पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेशावेळी रोहा तालुका युवासेना तालुकाप्रमुख रोशन पवार तसेच अष्टमी गावचे युवा नेतृत्व अमलकांत मोरे यांची उपस्थिती होती.या पक्षप्रवेशामुळे विरजोली गावातील शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.