Press "Enter" to skip to content

शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीत श्रीवर्धन असंख्य शेतकऱ्यांमध्ये असंतोष ; रायगडातील एकही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- सभापती वैकुंठ पाटील


पेण, ता. 27 (वार्ताहर) : महाराष्ट्रात यावर्षीच्या खरीप हंगामात पर्जन्याची तूट आणि पीक परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने 25 सप्टेंबर 2026 रोजी राज्यात दुष्काळग्रस्त जाहीर करून यामध्ये 265 तालुक्यांच्या समावेश केला त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हा एकमेव तालुका घेतल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे इतरही तालुक्यामध्ये भात शेतीचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता रायगडच्या एकही शेतकऱ्यांवर अन्याय राहू देणार नाही असे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले आहे.

रायगड जिल्हा हा पुर्वी भाताचा कोठार म्हणून संबोधला जायचा मात्र आता ती परिस्थिती राहिली नसून यावर्षी पेण, अलिबाग, खालापूर, कर्जत, महाड, मुरुड आणि रोहा या भागांमध्ये सुद्धा निसर्गाच्या लहरीपणामुळे भात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.भात पिकांवर पडलेली कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सर्व शेतकरी संकटात सापडले आहेत.त्यातच श्रीवर्धन मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी जिल्ह्यातील इतरही तालुक्यात भात शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे येथील शेतकरी हा संकटात सापडला असल्याने शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीत श्रीवर्धन बरोबर इतरही तालुक्यांचा समावेश होणे आवश्यक होते.त्यामुळे उर्वरित १४ तालुक्यांच्या शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त शेतीचे तात्काळ सर्वेक्षण व पंचनामे करून तसा अहवाल शासनाला देण्यात यावा असे आदेश जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यासह जवळपास इतरही सात-आठ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर प्रचंड संकट उद्भवलेले आहे त्यात शासनाने दुष्काळग्रस्त यादीत श्रीवर्धन तालुका घेतल्याने असंख्य शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या तालुक्यातही शेतीचे सर्वेक्षण व पंचनामे करून त्याचा अहवाल तात्काळ शासनाला कळविण्यात यावे असे आदेश देत आपण जिल्ह्यातील एकही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही.

वैकुंठ पाटील- सभापती, कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.