Press "Enter" to skip to content

पोस्टल युनियनचे दहावे द्विवार्षिक अधिवेशन संपन्न

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

उलवे, ता. २६ : “पोस्टाचे कामगार कालानुरूप बदल स्वीकारत आहेत. येणाऱ्या काळात आव्हान असणारच आहे. स्वतःला सतत अपडेट ठेवणे आणि माणुसकी हा धर्म समजून काम करणे गरजेचे आहे. मी समाजासाठी काम करत असताना जात-धर्म पाहत नाही. माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे माझ्या ह्रदयात कोरलेले आहे,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत पनवेल येथे रविवारी (ता. २६ )पोस्टल युनियनच्या दहाव्या द्विवार्षिक अधिवेशनात बोलताना म्हणाले. यावेळी पोस्टल युनियनच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे महापौर नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महेंद्रशेठ घरत पुढे म्हणाले, “रामशेठ ठाकूर यांनी व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यावर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ स्थापन केले. या माध्यमातून शेकडो सामाजिक कामे करण्यात आली. भगत साहेबांच्या नावाने शैक्षणिक संस्था काढली. तिचे नाव राज्यातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांत आहे. दर्जेदार स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारून त्यांनी खेळाडूंना व्यासपीठ दिले. मी राजकारणविरहित काम करत असल्याने सर्वपक्षीयांना एका व्यासपीठावर आणण्याची किमया करतो.”

नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज यांच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोस्टाचे कर्मचारी आणि युनियन प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.