Press "Enter" to skip to content

भाजपा नेते प्रितमदादा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे जावळे गाव खड्डेमुक्त

“ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कडू यांचा पुढाकार; गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण”

उलवे : जावळे गाव, उलवे नोड येथील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अत्यंत बिकट अवस्था झाली होती. संबंधित विभागाकडून रस्त्यांच्या समस्येकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. त्यातच गणेशोत्सव जवळ आल्याने ग्रामस्थांची गैरसोय वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या परिस्थितीची गंभीर दखल घेत जावळे गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रमोद कडू यांनी रस्त्यांची समस्या प्रितमदादा म्हात्रे यांच्या निदर्शनास आणून दिली.

समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रीतमदादा म्हात्रे यांनी ग्रामसेवक, संबंधित शासकीय अधिकारी आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे तातडीने व सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून जावळे गावातील रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील रस्ते खड्डेमुक्त झाल्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, जावळे गावाच्या विकासामध्ये ही महत्त्वाची भर ठरली आहे.

या कामासाठी पुढाकार घेणारे ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रमोद कडू आणि सातत्याने पाठपुरावा करून रस्त्याचे काम पूर्ण करून देणारे प्रितमदादा म्हात्रे यांचे जावळे गावातील सर्व रहिवाशांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.