Press "Enter" to skip to content

शेकाप व एकता असोसिएशनतर्फे पनवेलमध्ये आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी शिबीर; २५० नागरिकांनी घेतला लाभ


पनवेल: प्रतिनिधी

शेतकरी कामगार पक्ष आणि ‘एकता एज्युकेशनल अँड वेलफेअर असोसिएशन, पनवेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथे मोफत आयुष्मान भारत कार्ड आणि आभा (ABHA) कार्ड नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी पटेल मोहल्ला येथील आरिफ पटेल जनसंपर्क कार्यालयात हे शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये तब्बल २५० नागरिकांनी आपली नोंदणी करून प्रत्यक्ष लाभ घेतला.

माजी उपनगराध्यक्ष आरिफ पटेल, यासीन आरिफ पटेल, शेकाप कार्यकर्ते मझहर पठाण व त्यांच्या टीमच्या विशेष पुढाकारातून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा थेट लाभ मिळावा तसेच वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० आणि दुपारी ०३:०० ते संध्याकाळी ०६:०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमाला स्थानिक रहिवासी, महिला व ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील, पालिकेचे विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे, गटनेते केतन भगत, नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका मनीषा म्हात्रे, आर्या जाधव,शिवसेना उबाठाचे प्रवीण जाधव, अनंत म्हात्रे, दत्तात्रेय कडू, सागर पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजकांनी अतिशय नियोजनबद्ध रीतीने सर्व उपस्थितांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. या सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी आयोजकांचे आणि शेतकरी कामगार पक्षाचे आभार मानले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.