Press "Enter" to skip to content

हेमराज नाथा म्हात्रे यांची चेअरमनपदी निवड

पनवेल : प्रतिनिधी

पडघे विभागीय शिक्षण संस्थेच्या मंजुळा त्रिंबक ठाकूर इंग्रजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रथम चेअरमनपदी श्री. हेमराज नाथा म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. पडघे विभागीय शिक्षण संस्थेची स्थापना सन १९८९ मध्ये श्री. हेमराज नाथा म्हात्रे यांचे वडील तथा माजी पंचायत समिती गटनेते नाथा गोपाल म्हात्रे यांनी केली होती. त्यामुळे हेमराज म्हात्रे यांची चेअरमनपदी निवड झाल्याने पंचक्रोशीसह तालुक्यातील नागरिकांमध्ये नवचैतन्य व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडीप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, कार्याध्यक्ष पांडूशेठ भोईर, खजिनदार विष्णू जोशी, सचिव प्रकाश म्हात्रे, सहसचिव गणपत तांडेल तसेच संस्थेचे संचालक व सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना हेमराज म्हात्रे यांनी संस्थेची प्रगती, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे तसेच विद्यार्थ्यांना उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण कमिटी प्रयत्नशील राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.