Press "Enter" to skip to content

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मध्यभागी ठेवून रस्ता रुंदीकरण करा वंचितची मागणी

पेण ( प्रतिनिधी ) :- पेण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील पेण- खोपोली या रस्त्याचे रुंदीकरण होत असताना नगरपालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठेही न हलवता तो रस्त्याच्या मध्यभागी ठेवून दोन्ही बाजूने वाहने ये- जा करतील असा रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील धामणकर यांनी दि. 9 रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपूर्वी येथील आंबेडकरी समाजाने नगरपालिकेच्या माध्यमातून येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याची उभारणी केली त्यानंतर येथील परिसराचे सुशोभीकरण सुद्धा करण्यात आले परंतु आता शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातून नगरपालिकेच्या वतीने येथील रस्ते काँक्रिटीकरणाद्वारे रुंदीकरण होत असताना येथे असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला कुठेही न हलवता तो रस्त्याच्या मध्यभागी ठेवून दोन्ही बाजूने वाहने ये- जा करतील असा पद्धतीने रस्ता रुंदीकरण करून येणाऱ्या काळात सदरचा पुतळा पुर्णाकृती बसवण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील धामणकर यांनी मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह समाज कल्याण विभाग, मुंबई तसेच वंचितचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.